हिंदुत्वविषयक निवाडे
सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिसंबधी आणि तिच्या विरोधात लोकमत प्रबुद्ध करायला निघालेल्या फार मान्यवर अधिवक्त्यांनी हिंदुत्वविषयक निवाड्यांमधील सगळी गुंतागुंतच धूसर करून टाकली आहे. टीकाकारांनी केवळ मनोहर जोशींच्या खटल्यावरच, आणि त्यातही हिंदुधर्म (हिंदुइझम्) व हिंदुत्व यांच्यातील संबंधाच्या संदर्भातच, लक्ष केंद्रित केले आहे. खरे तर या निवाड्याने कायदा आणि वस्तुस्थिती यासंबंधी काही गुंतागुंतीचे वादमुद्दे उपस्थित केले आहेत. एकशे एकवीस …